Halloween party ideas 2015


काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ बाळासाहेब थोरात यांची अँँड ललिता पाटील यांनी घेतली भेट...!

अमळनेर-येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस अँँड ललिता पाटील यांनी आज मुंबई येथे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ बाळासाहेब थोरात यांच्याशी  अमळनेर विधानसभेची जागा काँग्रेसला कायम राहु देण्या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी अमळनेर ची जागा ही काँग्रेसला असल्या बाबत आश्र्वासित केले.तसेच जिल्ह्यातील इतर मतदार संघांविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी मा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मा मंत्री हर्षवर्धन पाटील,विधान परीषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
   आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षात झालेले फेरबदल हे विभागीय समतोल राखत केलेले आहेत.यामुळे ह्या नवीन टिम च्या माध्यमातून राज्यात नक्कीच काँग्रेसची सत्ता येईल असा विश्र्वास अँँड ललिता पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.