अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत थोर समाजसुधारक , साहित्यरत्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम चळवळीचे प्रणेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सदर प्रसंगी मनीषा मोहन पावरा या शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर मनीषा पावरा हिच्या वाढदिवसानिमित्ताने मुख्याध्यापक संदीप पवार यांनी भेटवस्तू देऊन अधिकाधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्याच्या शुभेच्छा दिल्या. तदनंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना 'जग बदल घालून घाव----- अर्थात अण्णाभाऊंची शाहिरी , व्यवस्था परिवर्तनाची ललकारी हे गंगाधर गीते लिखित आणि भारतीय साहित्याचे निर्माते अण्णाभाऊ साठे हे बजरंग कोरडे लिखित पुस्तकाचे परिचय करून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याची महती सादर केली . तसेच पी. एम. ठाकरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जोशपूर्ण गीते सादर केली. सदर प्रसंगी व्ही.डी. पाटील, पी. ए. शेलकर, डी. एस. कारले, रविंद्र चौधरी, धर्मेंद्र पाटील, अशोक सैंदाने आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना डी . ए. सोनवणे यांच्याकडून चॉकलेट देण्यात आल्या.