Halloween party ideas 2015


शहापुरचे मुख्याध्यापक आर .डी .पाटील यांनी रेल्वेत समुपदेशन करून महिलेला केले  तंबाखू मुक्त.

अमळनेर प्रतिनिधी- सध्या  तंबाखू खाल्याने भयंकर आजार निर्माण होतात हे खरे असले तरी तंबाखू खाणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे तंबाखू खाल्याने कॅन्सरसारखे भयंकर आजार निर्माण होतात. अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील मुख्याध्यापक आर डी पाटील कामानिमित्त रेल्वेने प्रवास करत असताना वयोवृद्ध महिला त्यांच्यासमोर तंबाखू खाल्ल्याचे दिसले त्यांनी अर्धा तास त्यांचे समुपदेशन केले तंबाखू खाल्ल्यामुळे कोण कोणते आजार निर्माण होतात याची सविस्तर माहिती दिली त्या माहितीचा त्यांच्या जीवनावर एवढा परिणाम झाला त्यांनी मुख्याध्यापक पाटील यांना आश्वासन दिले आज पासून आम्ही तंबाखू खाणार नाहीत अशी शपथच घेतली मुख्याध्यापक पाटील यांच्या समुपदेशनाचा त्यांच्यावर परिणाम झाला . मुख्याध्यापक आर डी पाटील यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र
 निम हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल चौधरी, मुख्याध्यापक विलास पाटील(रणाईचे,आर .बी पाटिल (फाफोरे)मुसले सर (शिरसाळे)व सर्व सोबत असलेल्या कर्मचारी यानी स्वागत अणि अभिनंदन केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.