जीपीएफ कपाती संदर्भातील महत्त्वपूर्ण खुलासा
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळा तुकड्या खाजगी प्राथमिक शाळा या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आव्हान करण्यात येते की जळगाव वेतन विभागाच्यावतीने जे पत्र जारी करण्यात आलेल़े आहे त्यामध्ये क्रमांक 8 चालू जो मुद्दा आहे त्यामध्ये जीपीएफ खाते बंद करून नवीन डीसीपीएस खाते उघडण्यास संदर्भात सूचना करण्यात आलेली आहे यासंदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे त्याबाबत त्यांनी सांगितले आहे की तो मुद्दा जरी समाविष्ट असला तरी देखील आपण आपली वेतन देयके पूर्वीप्रमाणेच जमा करावयाचे आहेत कोणत्याही कर्मचाऱ्याची डीसीपीएस खाती सुरू करण्यासंदर्भात सक्ती केली जाणार नाही 1 नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळा व तुकड्यावर कार्यरत असलेले सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली देयके पूर्वी प्रमाणे सादर करावयाचे आहे आपल्या संदर्भातला पुढील आदेश जोपर्यंत मुंबईवरून येत नाही तोपर्यंत कोणत्याही कर्मचारीची जीपीएफ अकाउंट बंद केले जाणार नसल्याचे अधीक्षक साहेबांनी सांगायचे आहे त्यासंदर्भात उद्या मी त्यांना संपर्क करून जीपीएफ खाते चालू ठेवण्यासंदर्भात व डीसीपीएस कपात सुरू न करण्याबाबतचे लेखी पत्र आपण उद्या देणार आहे तरी क्रमांक आठ चा मुद्दा चुकून तो मुद्दा आलेला आहे त्यासंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही तरी सर्वांना विनंती आहे आपण आपली देयके पूर्वी प्रमाणे सादर करावीत काही अडचण असल्यास अधीक्षक साहेबाशी किंवा जुनी पेंशन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांचेशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे