पालकांनी आपल्या पाल्याबाबत सजग रहावे
संदीप घोरपडे
अमळनेर प्रतिनिधी- शाळेत विद्यार्थ्यांना जे शिकवले जाते तेच पालकांनी घरी पाहिले पाहिजे शाळेची जेवढे कर्तव्य आहे तेवढेच कर्तव्य पालकांची आहे फक्त शाळेवर अवलंबून चालणार नाही सध्याचे वातावरण खराब आहे पालकांनी जागृत राहणे तेवढेच गरजेचे आहे मुलाच्या सगळ्या हालचालींवर लक्ष देणे गरजेचे आहे त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादू नका त्याला ज्या विषयात आवड असेल तेथे प्रोत्साहन द्या विद्यार्थी पालक एक मैत्रीचे नाते निर्माण करा असे अमळनेर येथील साने गुरुजी प्राथमिक शाळेतील पालक सभेत मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव संदीप घोरपडे बोलत होते.
साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचा पालक मेळावा शनिवारी उत्साहात संपन्न झाला, यावेळी शिक्षक पालक संघ, शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आदी समिती सदस्यांची निवड पालकांतून करण्यात आली, यावेळी संदीप घोरपडे पालकांना मार्गदर्शन केले, तर मुख्याध्यापिका देवरे यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली, मुख्याध्यापिका मेघा देवरे, संस्थेचे सचिव संदीप घोरपडे,अमृत पाटील, भास्कर बोरसे, यशवंतराव देशमुख, डॉ शेख आदी संचालक मंडळ, पालक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते
फोटो