अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नव्याने झेप घेणारे माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील भाजपात करणार प्रवेश-
अमळनेर तालुक्याची विधानसभा मतदारसंघाची गणिते बदलणार.
अमळनेर प्रतिनिधी- सध्या तामस वाडी येथील माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील अनेक गावांना भेटीगाठी घेऊन मतदारांची सहानुभूती मिळताना दिसत आहे नवीन जो मतदार आहे तरुण वर्ग यांना जास्तीत जास्त आकर्षित करून त्यांच्या स्पर्धापरीक्षांना मार्गदर्शन व विविध कार्यक्रम सध्या जोरात दिसत आहेत. अमळनेर विधानसभेची निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी सुरू आहे ते लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवणार सध्या मुळे शहरात चर्चा सुरू आहे.
माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांचा उद्या भाजपात प्रवेश होणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजनस यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघामधून विधानसभा लढवण्यास साहेबराव पाटील इच्छुक आहेत. या बाबत काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र भाजपात अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी बरेच चेहरे इच्छुक आहेत. त्यांचा पण विचार भाजप हायकमांड करेल का ❓ या कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान साहेबराव पाटील यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशाबाबत होकार दिला आहे.
सध्या अमळनेर तालुक्यात भाजपाचे सहयोगी सदस्य , मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय
आमदार शिरीष चौधरी भाजपच्या वतीने निवडणूक लढवतील की अपक्ष लढवतील याचे उत्तर सध्या तरी मिळणार नाही येणारा काळ ठरवेल.
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील यही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागलेले आहेत तेही भाजपमध्ये आहेत त्यामुळे सध्यातरी भाजप मध्ये अमळनेर तालुक्यात भाऊगर्दी आहे त्यामुळे तिकीट कुणाला हे सध्या कोणी सांगू शकत नाही हे आगामी काळच ठरवेल. त्यामुळे अंमळनेर तालुक्याची विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची होण्याची शक्यता आहे.