डॉ. गिरीश गोसावी
अमळनेर प्रतिनिधी- जंतांचा प्रादुर्भाव अस्वच्छता मलीनता याचा परिणाम आहे, जंत संसर्गामुळे बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो. बालकाचे आरोग्य त्याची पोषण विषयक स्थिती सुधारावी यासाठी शासनाने 1 ते 19 वयोगटातील सर्व शासकीय अनुदानित शाळा शासकीय खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना 8 ऑगस्ट 2019 ला जंतनाशक गोळी दिली जाणार आहे यासाठी आपल्या शाळेतील कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दखल शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांनी घ्यावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकूखुर्द तालुका अमळनेर येथे नोडल टीचर यांची सहविचार सभा संपन्न प्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी बोलत होते.
जंतनाशक गोळी घेताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन सहविचार सभेत करण्यात आले यावेळी ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक आर एम निकुंभ ,राकेश शिंपी,
श्रीमती के .एल गायकवाड ,श्रीमती शितल सोनवणे, श्रीमती मनीषा पाटील, यांनी प्रयत्न केले.
यावेळी सहविचार सभेत शिक्षक रमेश पारधी गांधली, सुषमा सूर्यवंशी कु-हे, सीमा पाटील लोन ,ज्ञानेश्वर पाटील, ईश्वर महाजन देवळी, जिजाबराव माळी निमझरी ,अरविंद भामरे म्हसले, विजय पाटील दहीवद, धनंजय सूर्यवंशी कु-हे, दुर्गादास कोळी कंडारी, रामकृष्ण महाजन, रवींद्र पाटील दरेगाव देवेंद्र पाटील सोनखेडी, व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.