Halloween party ideas 2015


अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या बैठकीत अकुशल, असंघटित कामगारांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बैठक दिनांक 14 जुलै वार रविवार रोजी अंमळनेर तालुका कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री विकास महाजन सर तसेच तालुका अध्यक्ष श्री मकसूद बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.
एक जुलै ते 15 जुलै हा पंधरवडा युनो ही संघटना कुशल व असंघटित कामगार यांचा पंधरवाडा म्हणून घोषित करते व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुशल व असंघटित कामगारांचा सन्मान करते. त्याच धर्तीवर अंमळनेर तालूका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आदर्श समोर ठेवून अमळनेर तालुक्यातील कुशल व असंघटित कामगारांचा सत्कार यथोचितरित्या व्हावा या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांचा सत्कार तालुका कार्यालयात साजरा करण्याचे ठरविले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक श्री रमेश बहुगुणे हे उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजातील मोठ्या व्यक्तींचा सत्कार हा समाज तर करत असतो परंतु अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही अशी संघटना आहे की ज्या  संघटनेने प्रथम कुशल व असंघटित कामगारांचा सत्कार करण्याचा मानस व्यक्त केला व असा सत्कार आजच्या या कार्यक्रमात घडवून आणला. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सेवानिवृत्त प्राध्यापक वाणिज्य शाखा प्रमुख प्रताप महाविद्यालय अमळनेर श्री रमेशराव बहुगुणे यांचा सत्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष मकसूद बोहरी यांनी केला. तसेच सदर कार्यक्रमासाठी नगरपालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी हे खास उपस्थित होते समाजातील असंघटित व कुशल कामगारांना जो सत्कार दिला गेला ते सत्कारार्थी मान्यवर हे तळागाळातील लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत ठेवणारे असे सत्कार मूर्ती समाजभूषण आहे असेही श्री रमेशराव बहुगुणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले या सत्कार मूर्ती मध्ये नरेंद्रभाई गुजराती रेडिओ टेप एफएम रिपेअरची कामे करतात तसेच अल्लाउद्दीन शेख जे गेल्या पन्नास वर्षांपासून पेपर विक्रेत्याची कामे करतात, यशवंत बडगुजर प्लंम्बर, अमळनेर शहर दगडी दरवाजा जवळ सतत हसत मुखाने वाहनांची होणारी गर्दी सांभाळून ट्रॅफिक कंट्रोल करण्याचे काम करणारे श्री देविदास चौधरी होमगार्ड यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. दुसऱ्यांचे दुःख आपले समजून रुग्णांची सेवा करणारे ॲम्बुलन्स चालक श्री नाना पाटील यांचाही सत्कार झाला. समाजातील मनोरुग्ण अवस्थेत असलेली सुमारे 42 मनोरुग्णांना माणसात आणण्याचं काम पराग ताथेड सारख्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला,एसटी डेपो मधील हेड मेकॅनिक सिद्धार्थ सोनवणे, साने गुरुजी ग्रंथालय ग्रंथालयातील सहाय्यक ग्रंथपाल सुरेश जोशी ,मोबाईल मेकॅनिक युवराज महाजन , रेल्वे सफाई कर्मचारी मेहबूब शेख मेहतर तसेच मोसिनखा पठाण, गणेश भिका बडगुजर भाजीपाला विक्रेते , धनंजय पाटील पिठ गिरणी चालक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळेस महिला आघाडी प्रमुख एडवोकेट सौ भारती अग्रवाल यांनी महाराष्ट्र शासनाचे राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष मकसूद भाई बोहरी तालुका संघटक राजेंद्र सुतार , सहसंघटक बापू चौधरी, सचिव विजय शुक्ल, सहसचिव योगेश पाने, कोशाध्यक्ष महेश कोठावदे, प्रसिद्धीप्रमुख जयंतीलाल वानखेडे , उर्जा मित्र सुनील वाघ कार्यकारणी सदस्य खदिर सादिक , ताहा बुकवाला, विजयकुमार सुतार ,अनिल घासकडबी, जोहर राजा, सौ.आरती रेजा,सौ. हेमलता बडगुजर, सौ. प्रभावती पाटील, सौ. ज्योति भावसार,सौ. अंजू ढवळे, सौ. मीना अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील वाघ यांनी केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.