अमळनेर प्रतिनिधी
जि.प.उच्च प्राथ.शाळा,पिंगळवाडे ता.अमळनेर येथे 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत शाळेस दिलेल्या उद्दिष्टानुसार 22 वेगवेगळ्या रोपांची लागवड गावच्या प्रथम नागरीक तथा सरपंच सुमनताई वसंतराव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष नाना सपकाळे, सदस्य डी.पी.पाटील, राजेंद्र भिल, कविता पाटील, किरण पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील, वंदना सोनवणे, गावातील नवयुवक व शाळेतील कब पथकातील विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच मा.श्रीम.सुमनताई पाटील यांचे शुभहस्ते भारतात उगवणाऱ्या आयुर्वेदिक औषधीपैकी एक व सुगंधी फुले देणाऱ्या सदाहरीत बकूळाचे रोप लावतांना... "या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या..." या लहानपणी च्या बकूळीच्या फुलांची कविता सर्वांच्या ओठी येऊन बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कडूलिंब, करंज, अशोक, सोनचाफा इ. रोपांची लागवड करण्यात येऊन लावलेले रोपे 100% जगवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.