Halloween party ideas 2015


पांचशे मिटरचा आतीलअंगणवाड्यांचे समायोजन नाही 
 एम.ए. पाटील . राज्याध्यक्ष
(आठ -सात जि.प.च्या पत्राने
जिल्हयात अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ !)

अमळनेर प्रतिनिधी

 एकात्मिक बालविकास विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारीअंगणवाडी सेविका -मदतनीसांवर महिला व बालविकास अधिकारी राफिक तडवी . जि.प .जळगांव यांनी जा . क्र . बाक / आस्था- आर . आर ,/२१९ / २०१९ दि .८ जुलै१९चे पत्र काढूण जळगांव जिल्हयांतील पाचशे मिटरच्या आतील कमी लाभार्थी असलेल्या २२३६ अंगणवाड्यांचे समायोजन करणार असल्याचे पत्राने जिल्हयांत एकच खळबळ उडाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते . याबाबत तातडीने मा .आयुक्त मॅडम इंदामालो यांच्याशी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ,ठाणे . चे अध्यक्ष एम .ए. पाटील यांनी बैठक घेऊन चर्चा करून , हायकोर्टाचा स्थगन आदेश सादर केला , कुठल्याही अंगणवाडीचे समायोजन व कर्मचारी कमी होणार नाही . आयुक्त  समोर सांगण्यांत आले .
            याबाबत सविस्तर वृत असे कि , बालविकास
प्रकल्पांतर्गत गावातील ज्या अंगणवाडी ५०० मिटरच्या आत आहेत, त्याची माहिती प्रकल्प कार्यालयातून आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात आलेली आहे. गावातील बरीच अंगणवाडी केंद्रे ५०० मिटरच्या आत आहेत.अशा परिस्थितीत एक अंगणवाडी केंद्र बंद करून दूस~या र्अंगणवाडी केंद्रात समायोजन करुन उर्वरित अंगणवाडी केंद्रे बंद करण्यात येणार आहे, असा अर्थ लावण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून *महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे* नेते व प्रतिनिधी *मा.आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना* नवी मुंबई यांना दिनांक १०/०७/१९ रोजी भेटले व या विषयी सविस्तर चर्चा केली. *मा. आयुक्त महोदयांनी ५०० मीटरच्या अंतरा मध्ये अंगणवाडी केंद्र असल्यामुळे कोणतीही अंगणवाडी केंद्र बंद करण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष  एम .ए. पाटील .व सरचिटणीस बृजपाल सिंह वाघेल . या नेतेना सांगितले.*
 
*मा.उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही अंगणवाडी केंद्राचे समायोजन करता येणार नाही, असा आदेश मा. उच्च न्यायालयांनी दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी आपल्या संघटनेने दाखल केलेली (जनहित याचिका क्र.६७/२०१८) मध्ये दिलेल्या आहे.*
         जळगांव जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका / मदतनी स यांनी घाबरून जाऊ नये . व समायोजन आणि नोकरीवरून कमीची भिती काढून आपापल्या कामाला लागा !व ठाणे संघाच्या रितसर वर्गणी भरून सभासद ०हावे . व लुटमार करणाऱ्यांपासुन सावध रहावे . असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्म , संघठाणेचे संघटक सचिव - भानुदास पाटील . (मुंगसेकर ), जिल्हाध्यक्षा सुषमाचoहाण , गोकुळ सुरळकर धम्म भालेराव . यांनी एका लेखीप्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे ,

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.