Halloween party ideas 2015



"ब्राम्हणवेल  विद्यालयाच्या विदयार्थ्यांची नावे मंगळावर पोहचणार..... "
नासाचा उपक्रम, आतापर्यंतची ऐतिहासीक नोंद होणार

साक्री प्रतिनिधी

_,,,-. साक्री तालुक्यातील कै. बळीरामदादा माध्य. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नावे थेट मंगळावर पोहचणार असूनही एक ऐतिहासिक नोंद होणार आहे.
     नासा नॅशनल एरोनोटिक्स अॅड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशनचे मंगळावर मंगळ रोव्हर२०२०हे अंतरिक्षयान लालग्रह म्हणून ओळखले जाणारे यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्षयानावर स्टेन्सिल्ड चिपवर आपली नांवे पाठवून मानवी इतिहासात दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासीक संधी नासाच्या वतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन दिली आहे. ही मोहीम मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यतच्या मिशन ला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीमेतंर्गत राबवत आहे.
      नासाच्या कॅलिफोर्निया येथील जेट पॉप्युलेशन लॅबोरेटरीतल्या मायक्रो डिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलीकॅनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराच्या भागाइतक्या ( ७५ नॅनोमीटर ) रुंदीत आपण नोंदवलेली नांवे लिहीली जाणार आहेत. इतक्या छोटया आकारात एकडेमी आकाराच्या चिपवर १० लाख नांवे मावतील. या चिपवर रो०हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील.
  या ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रो०हर तयारी करत असतांना, सर्वजण या नव्या मोहिमेत सामील व्हावेत, असे नासाच्या वॉशिग्टन येथील सायन्स मिशेनचे डायरेक्टर थॉमस झुरबुचेन म्हणाले.
  या उपक्रमासाठी ३० सप्टेबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत नांवेmars.nasa.gov या संकेतस्थळावर नोंदणी करुन ज्यांना या उपक्रमांतर्गत आपले नांव मंगळावर पाठवावयाचे असेल त्यांनीhttps://go.nasa.gov/Mars2020 Passया संकेतस्थळावर नांव नोंदणी केल्यावर बोर्डिग पास ही मिळवा ता येईल.
   या उपक्रमासाठी नागझिरी केंद्र प्रमुख सौ. ताई सो. बेबी आहिरे, मुख्याध्यापक ईश्वर बाविस्कर, विज्ञान शिक्षक काशिनाथ माळी यांनी महत्त्व सांगितले . या आवाहनानुसार विज्ञान शिक्षक काशिनाथ माळी यांनी विद्यालयातील सर्वशिक्षक व मुलांची नोंद करुन या घटनेचे साथीदार झालेत व या उपक्रमाचे बोर्डिग पासचे वितरण केंद्र प्रमुख सो. बेबी आहिरे मॅडम, मुख्या. ईश्वर बाविस्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन संस्थाध्यक्ष तुकाराम महाजन, संस्था सचिव एकनाथ माळी, संचालक मंडळ, सर्व शिक्षकवृंद आदी नी केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.