Halloween party ideas 2015



अखेर दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सात्री येथील 35 धरणग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय

आ.शिरीष चौधरींनी मिळवून दिला भूसंपादनाचा मोबदला,शेतकरी बांधवात समाधान

अमळनेर : तब्बल दोन वर्षांनंतर पाडळसरे धरणांतर्गत येणाऱ्या सात्री गावातील ३५ शेतकऱ्यांना भूसंपादनाचा ५० टक्के मोबदला मिळाला आहे. यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन आगाऊ अनुदान देण्यास सहकार्य केले.
तालुक्यातील सात्री हे गाव पाडळसरे धरणांतर्गत पूर्ण जाणार आहे. २००३ मध्ये त्याचा सर्व्हे करण्यात आला होता. २०१५ मध्ये अवॉर्ड जाहीर करून जमिनीचा ताबा शासनाने घेतला होता. गेल्या दोन वर्षांपासून चार कोटी रुपये येऊन पडले होते. त्यातील ३५ शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात ५० टक्के रक्कम दोन कोटी ८० लाख रुपयांची मागणी केली होती. बन्सीलाल बोरसे, मनोहर पाटील, सुधाकर बोरसे, अशोक बोरसे, बाळू पाटील, शालिक पाटील, सोमनाथ पाटील, एकनाथ पाटील, रमेश पाटील, महेंद्र पाटील, चुनिलाल पाटील, राजमल पाटील, नत्थू न्हावी, चिंधाबाई भिल, परशुराम पाटील, गव्हरलाल पाटील, रामचंद्र पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील आदी शेतकरी त्यांच्या संपादित जमिनीचा ५० टक्के आगाऊ मोबदला मागत होते. मात्र प्रशासनाकडून मोबदला मिळत नसल्याने ललित बोरसे, अनिल पाटील, अशोक पाटील, शालिक पाटील, प्रभाकर बोरसे आदींसह शिष्टमंडळाने आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेऊन ५० टक्के रक्कम आगाऊ देण्याचा आग्रह धरला आणि ३५ शेतकऱ्यांना रकमा देण्यात आल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे या प्रसंगी आ शिरीष चौधरी, प्रातधिकारी सीमा अहिरे,  नगरसेवक बाळासाहेब सदांनशिव, श्याम पाटील, सुनील भामरे,जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी,आबु महाजन,गुलाम नबी, मनोज शिंगाणे, गुलाब आगळे, हेमंत चौधरी,अतुल बागुल, दिनेश सोनवणे, यावेळी उपस्थित होते..

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.