ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
उरुळी कांचन, (वार्ताहर) :-
जीवनाचे रहस्य समजवण्यासाठी व जीवन उत्तम प्रकारे सुखकर जगण्यासाठी सदगुरुची आराधना महत्त्वाची असते. गुरुहा संत कुळीचा राजा असुन गुरु हा शिष्याचा प्राण विसावा असतो. गुरुसारखे दैवत जगात नाही.विविध गुरुनी आपले समर्पीत कार्य करुन जगात संदेश दिलेत. अध्ययनापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ कारण या कर्मफळ त्यागापासून लवकर शांती मिळते. असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले.
साम्ययोग मिशन न्यास - विश्व मानव चेतना मंदिर उरुळी कांचन (ता.हवेली) याठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 'गुरुपुजन' योगानन्दजी महाराज यांचे करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना वरील विचार डॉ.भोळे मांडले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन उपस्थित होते. तसेच म. गा. सर्वोदय संघाचे विश्वस्त डॉ. नारायण भोर, महंत रविराज पंजाबी, चंद्रशेखर कोठारी, पत्रकार अमोल भोसले, महानुभाव परिषेदेचे हवेली तालुका अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे आदी मान्य वर उपस्थित होते.