Halloween party ideas 2015

  जळगाव जिल्ह्यातील यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी.

२२ जुलै ते २५ जुलै  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  आयएएस अधिकारी मनोज महाजन करणार आहेत मार्गदर्शन.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे आव्हान 

अमळनेर प्रतिनिधी- सध्याचे युग स्पर्धेचे आहे परदेशी युगात टिकायचे असेल तर भरपूर मेहनत करणे आवश्यक असते परंतु कधीकधी मार्गदर्शनाच्या अभावी आपले स्वप्न पूर्ण होत नाही योग्य मार्गदर्शन राहिले तर आपण ध्येयापर्यंत जाऊन आपले उद्दिष्ट पूर्ण करतो जळगाव जिल्ह्यात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये आपली चुणूक दाखवत आहेत. कधी कधी काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असते आपल्या जळगाव जिल्ह्यातील आय ए एस अधिकारी मनोज महाजन स्पर्धापरीक्षेची वारी , महाविद्यालयाच्या दारी हा उपक्रम घेऊन येत आहे तरी जळगाव जिल्ह्यातील तरुणांना ते मार्गदर्शन करणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.
         
जळगांव जिल्ह्यात  UPSC ची वारी
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी. राज्यात ज्यांना काही नवीन करून दाखवायचं आहे अशा  उच्चपदस्थ अधिकारी(आयएएस,आयएफएस,आयपीएस,आयआरएस)आणि सामाजिक सेवा करणाऱ्यांनी वारी यूपीएससी ची हा अभिनव उपक्रम २०१७ पासून सुरू केलेला आहे.   
पहिल्या वर्षी जुलै 2017 मध्ये 
*श्री सौरभ सोनवणे* (भा.प्र.से)
सहायक सचिव, युवा एवं खेल मंत्रालय,भारत सरकार;
*श्री महेश चौधरी*  (भा.प्र.से.)
सहाय्यक सचिव, जलशक्ती मंत्रालय , भारत सरकार
*श्री आशिष पाटील*,(भा.प्र.से)
सहायक सचिव, जलशक्ति मंत्रालय,भारत सरकार 
यांनी जळगाव जिल्ह्यात हा उपक्रम राबविला. दुसऱ्या वर्षी जुलै 2018 मध्ये *मा.श्री मयूर सूर्यवंशी* (भा. प्र. से. ), सहायक जिल्हाधिकारी , पुरी, ओडिशा; *श्री भुवनेश पाटील*, सहायक जिल्हाधिकारी, *मयुरभंज* यांनी तो पुढे नेला. तीच परंपरा या वर्षीही टिकवून पुढे नेण्यात येत आहे. 
राज्यातील विविध जिल्ह्यात हा कार्यक्रम दरवर्षी टप्प्याटप्प्याने राज्यभर राबविण्यात येतो.यात *यूपीएससी* मध्ये पास झालेले मुलं तुम्हाला मार्गदर्शन करतील. वर्षभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत हा कार्यक्रम राबविला जातो.
*यावर्षी जळगांव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये 22 जुलै ते 25 जुलै दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे*  यात 2018 च्या *युपीएससी परीक्षेत 125 रँक* मिळवून घवघवीत यश संपादन करणारे *मा.श्री मनोज महाजन*(IAS) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्राच्या अनेक थोर परंपरांपैकी  एक-पंढरीची वारी. दर वर्षी या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने  भाविक जमतात. यात कोणी आयोजक नसतो, संयोजक नसतो, नियोजक नसतो पण हे जागतिक आश्चर्य दरवर्षी घडते. सर्व आपोआप होत जाते. "जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांस सांगावे " अशी सोपी ज्ञानार्जनाची पद्धत. जो भावसागरातून मुक्त होतो त्याला बुडत्या जणांचा कळवळा येणे साहजिक असते. असंच इतर अनेक क्षेत्रातही का घडू नये ?
 कोणता अभ्यास करावा, कसा करावा या बद्दल मार्गदर्शन मिळणे कठीण, क्लासेसचा व्यवसाय. त्यात गरिबांचे पोरं आशेवर दाखल होतात. वयाची ४-५ वर्षे , पैसा खर्च होतो. हातात बऱ्याचदा  निराशाच पडते.
हजारो मनुष्यापैकी एखादाच पूर्णत्वाची इच्छा करतो अश्या हजारांपैकी एखादाच पूर्णत्वास पोहचतो. तसेच शेकडो, हजारो विद्यार्थ्यांपैकी एखादाच UPSC ची तयारी करतो . अश्या शेकडो पैकी एखादाच  UPSC पास होतो. पास न झालेल्या तरुणांमध्ये निराशा कमी करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. ज्या लोकांना खूप मेहनत करायची तयारी असेल त्यांनीच यात उतरावं आणि जे उतरलेत त्यांना अभ्यासाचा नेमका मार्ग दाखवावा. तेच लोक योग्य रीतीने सांगू शकतात जे या दिव्यातून पार झालेले आहेत.
असे UPSC  पास झालेले अधिकारी एकत्र आले आणि एक उपक्रम राबवण्याचा ठरविले. जशी पंढरीची वारी निघते तशी आपण UPSC  वारी महाराष्ट्रभर काढायची. यात कोणी क्लास, नेता आयोजक नसावा, कोणाला आपल्या खिशातून पैसे टाकावे लागू नये, म्हणजेच संयोजक नसावा, यात कोणाला आर्थिक फायदा नसावा, याचे श्रेय कोणालाही जाऊ नये. जेणेकरून एक पायंडा पडून दरवर्षी विद्यार्थ्यांना चांगले आणि खरे मार्गदर्शन मिळत राहावे.
 या उद्देशाने वारी यूपीएससीची सुरू आहे आणि अव्याहत पणे चालू राहील. यावर्षी *22 जुलै ते 25 जुलै* विविध महाविद्यालयात वारी यूपीएससीची खालील प्रमाणे निघाली आहे.
*22 ते 25 जुलै 2019*
1)22 जुलै 2019 - *रा.वि. चाळीसगांव* वेळ दुपारी 12.00
2) 23 जुलै 2019- *प्रताप महाविद्यालय अमळनेर* दुपारी 12.00 वा.
3) 24 जुलै 2019 *कला वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय धरणगांव* सकाळी 11.00 वा
4)24 जुलै 2019- *कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड* दुपारी 3 वाजता..
5)25 जुलै 2019- *किसान महाविद्यालय पारोळा* दुपारी 12.00 वा.

*तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.