Halloween party ideas 2015


प्रतिष्ठा फौंडेशनचे स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्कार जाहिर 
रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी सांगलीत होणार सोहळा

अमळनेर येथील प्रा जयश्री साळुंखे यांना उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार घोषित

सांगली  प्रतिनिधी
प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळा रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी सांगली येथील टिळक स्मारक भवन येथे दुपारी ३:३० वाजता आयोजित केला आहे. *जागतिक किर्तीच्या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार मा. गेल ऑम्वेट यांच्या हस्ते हा स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव व सचिव सौ. विद्या जाधव यांनी दिली. जाहीर झालेले पुरस्कार असे,
🏆 *स्त्री प्रतिष्ठा शिक्षणरत्न सन्मान पुरस्कार* 
🎖 मा. पुष्पा दत्त कळेकर (संस्थापिका सदस्या, श्री दत्त शिक्षण प्र.मंडळ, श्री दत्त एज्युकेशन सोशल फाऊंडेशन शिरोळ)

🏆 *स्त्री प्रतिष्ठा साहित्यिका सन्मान पुरस्कार* 
🎖 मा.अरुणा पंजाबराव सबाने (ज्येष्ठ साहित्यिका, अध्यक्ष- भारत कृषक समाज, नागपूर)
🎖 मा.डॉ. सुनिता बोर्डे-खडसे (साहित्यिका/सदस्य, एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई इतिहास अभ्यासमंडळ.) 
🎖डॉ. प्रतिभा सुरेश जाधव (साहित्यिका/संस्थापक अध्यक्ष- काव्यप्रतिभा विविध बहुद्देशीय संस्था, नाशिक)
🎖मा. नंदिनीताई साळुंखे-पाटील (साहित्यिका/अध्यक्ष- महाकवी कालिदास साहित्य प्रतिष्ठान, इस्लामपूर)
🏆 *स्त्री प्रतिष्ठा प्रशासन सन्मान पुरस्कार* 
🎖मा. अनिता देशमुख (तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा)
🏆 *स्त्री प्रतिष्ठा धन्वंतरी सन्मान पुरस्कार* 
🎖डॉ. श्रध्दा महाजन (माळी) (कार्याध्यक्ष- कृती फाऊंडेशन ऑस्ट्रेलीया, भारत, युएई / इंडियन रेडक्रॉस, जळगाव)
🏆 *स्त्री प्रतिष्ठा अध्यापिका सन्मान पुरस्कार* 
🎖मा. सुुनिता सुरेश कुलकर्णी (गोटखिंडी, ता. वाळवा, सांगली)
🎖मा. वर्षा प्रकाश नवगिरे (महांगुळ, ता. माळशिरस जि. सोलापूर)
वनमाला यादवराव पाटील (भिलपुरी, जालना)
🎖मा. भाग्यश्री शिवशंकर वाठारे (सांताकु्रझ मुंबई) 
🎖मा. मनिषा रायजादे-पाटील (श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ,मिरज )
🎖प्रा. दिपाली अतिश सोसे (संस्थापक, आनंदी गुरूकुल ऍकॅडमी, अकोला)
🏆 *स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका सन्मान पुरस्कार* 
🎖मा. गितांजली विजयकुमार उपाध्ये (जॉ. सेक्रेटरी, दक्षिण भारत जैन सभा, सांगली)
 🎖मा.कांचन बिरा करे (सामजिक कार्यकर्त्या, नंदेश्वर, ता. मंगळवेढा, सोलापूर)
🎖 मा.शारदा अशोक पाटील (अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, धुळे)
🎖मा. राजश्री जंबुकुमार साकळे (संस्थापक, शरीरबोध सामाजिक संस्था, कोल्हापूर)
🎖 *मा.प्रा.जयश्री दाभाडे-साळुंके ( अध्यक्ष, आदिवासी ए. सं. समिती महाराष्ट्र, अमळनेर)* 
🎖मा. माधवी किरण शिंदे (सदस्य, अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार असो. पुणे.)
🎖मा. कालिंदी विश्वनाथ पाटील (सचिव, त्रिरत्न महिला संस्था, उमरगा, जि. उस्मानाबाद)
🎖मा. दिप्ती (प्रेरणा) द. गावकर (संस्थापक अध्यक्ष, प्रेरणा फौंडेशन, बदलापूर)
🎖मा. शशिकला हरी गावडे  (अध्यक्ष, झलकारी संस्था आरग, ता. मिरज)
🎖मा. आरती आनंद धारप (सामजिक कार्यकर्त्या, रोहा, रायगड)
🎖मा. अचला धनंजय धारप (सामजिक कार्यकर्त्या, रोहा, रायगड)

🏆 *स्त्री प्रतिष्ठा उद्योजिका सन्मान पुरस्कार* 
🎖मा. अनिता सचिन कोळी (मानसी ब्युटी पार्लर/ प्रोफेशनल ब्युटी थेरपिस्ट, मांजर्डे, ता. तासगाव जि. सांगली.
🎖मा. रश्मी श्रीकांत वाघमोडे (प्रोफिशिअंट कौन्सेलिंग कॉर्पोरेशन, ठाणे)
🎖मा. निशीगंधा निवास कदम (रोल्स मनिया फूड फ्रेन्चीसे, सांगली)
🎖मा. करिश्मा महेबुब सय्यद (प्रोफेशनल ब्युटी थेरपिस्ट, तासगाव)
🎖मा. मनिषा सुरेश बडगुजर (सावी आर्ट ऍण्ड क्रॉप्ट क्लासेस, नाशिक)

🏆 *स्त्री प्रतिष्ठा क्रीडासन्मान पुरस्कार* 
🎖मा. पै. प्रेरणा गायकवाड (राष्ट्रीय कुस्ती पटू, सांगली)

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.