Halloween party ideas 2015


जिद्द व चिकाटी अंगीकारल्यास यश निश्चित 
मनोज महाजन यांचे मनोगत 
(आय.ए.एस.अधिकारी)
 चोपडा प्रतिनिधी
चोपडा येथील महाजन इंग्लिश क्लासेस आयोजित भव्य बक्षिस वितरण समारंभात नुकतेच यु पी एस सी उत्तीर्ण झालेले२५ वर्षीय अडावद येथील रहीवाशी व आय ए एस अधिकारी निवड झालेले मनोज महाजन यांनी जिद्द व चिकाटी अंगकारले तर यश निश्चित मिळते , यासह आई वडीलांचे संस्कार व त्यांची स्वप्न डोळ्यासमोर ठेवुन आपण मेहनत घेतली तर सर्व स्वप्न पुर्ण होतात असे आवाहन करुन त्यांनी विध्यार्थांना मार्गदर्शन केले. आक्कासो शरदचंद्रिका नाटयगृहात गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
प्रा. डॉ.ए एल चौधरी प्राचार्य कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा हे होते त प्रमुख अतिथी निलेश पाटील उपशिक्षणाधिकारी ,रविंद्र  महाजन नायब तहसीलदार यावल ,अॅड  रविंद्र जैन,चोपडा प्रा डॉ. अनंत देशमुख, सौ संध्या माळी नगरसेविका चोपडा,सौ जया पाटील माजी नगराध्यक्ष चोपडा,डी एम जायस्वाल पंकज विद्यालय चोपडा, भगवान न्हायदे पत्रकार ,अनिताताई हरताळकर विवेकानंद हॉस्पिटल चोपडा ताईसो सौ भावना माळी लोकनियुक्त सरपंच अडावद,डॉ. संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी. कु श्रुष्टि सुर्यवंशी या विद्यार्थिनीने इ 10 वी इंग्रजी विषयात चोपडा तालुक्यात 92 मिळवत प्रथम येण्याचा मान मिळविला•त्याच प्रमाणे GTS परीक्षेत यश संपादन करणाऱ्या नाशिक विभातून प्रथम,जिल्हास्तरीय, व तालुका स्तरीय भक्ती पाटील, सृष्टी जैन, रितु पाटील, सेजल हिंगे,रविंद्र पाटील, नचिकेत पाटील ,प्रज्वल पाटील, निखिला पाटील, कृष्णा जैन सह गुणवंत विध्यार्थांना बक्षीस वितरण प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात  आले• यावेळी अंपगावर मात करुन शिक्षणाधिकारीपदी उत्तीर्ण झालेले निलेश पाटील यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.  महाजन इंग्लिश क्लासेस चे संचालक दिपक महाजन  यांनी प्रास्ताविक केले तर प्राचार्य संदिप महाजन  यांनी सूत्रसंचालन केले . यावेळी विध्यार्थीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.