अमळनेर प्रतिनिधी
शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक ,येथे अण्णाभाऊ साठे यांच्या ५० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अण्णाभाऊं साठे याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला बहुजन रयत परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे,प्रा डॉ. विजय तूंटे,प्रा विजय गाढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
त्या नंतर प्रा डॉ विजय तूंटे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्याचे थोडक्यात कार्याविषयी माहिती दिली.
या वेळी सुरेश कांबळे,संजय मरसाळे, हरिश्चंद्र कढरे सर,नारायण गांगुर्डे, रामकृष्ण पाटील,आत्माराम अहिरे,राजेंद्र पाटील सर,सत्तार खान,रवींद्र मरसाळे,ललित बोरसे,बाळा चंदनशिव,जितू कढरे,लखन चंदनशिव,अजय भामरे सर,संजय वाघ,अनिल मरसाळे,प्रवीण वाघ, आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.