मारवड ता. अमळनेर :-
येथील पोलिस ठाण्याचे एपीआय समाधान पाटील यांची बदली झाल्याने त्याजागी इन्चार्ज म्हणून एपीआय रावसाहेब फुला रुजू झाले आहेत. ते याआधी नाशिक येथे कार्यरत होते. त्यांनी
आज सकाळी मारवड पो स्टे हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेवुन त्यांना आगामी सण उत्सव बाबत माहिती घेतली व त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. तसेच मारवड पोलिस स्टेशन हद्दीतील सेंट्रल बॅंक आॅफ इंडिया व जळगाव जिल्हा सहकारी बॅंक लि येथे भेट देवुन त्यांना बॅंक व एटीएम सुरक्षेचा आढावा घेवुन सुरक्षिततेच्या उपायांबाबत योग्य त्या तोंडी व लेखी सुचना दिल्या. याठिकाणी रुजू झाल्याबद्दल पत्रकार डॉ विलास पाटील यांच्यातर्फे तसेच पोलिस पाटील संघटनेच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल रोहिदास जाधव,फिरोज बागवान,भास्कर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील (करणखेडा) आदी हजर होते.