अमळनेर प्रतिनिधी - पातोंडा येथे चार वर्षांपुर्वी शेतकरी पॅनलला पायाभुत करीत परिवर्तन पॅनलने एक हाती सत्ता मिळवत विविध कार्यकारी सह सोसायटीत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळेस श्रीकृष्ण पवार हे चेअरमनपदी विराजमान झाले. त्यानंतर ठरल्या नुसार श्रीकृष्ण पवार यांनी राजीनामा दिल्यावर विठ्ठल चौधरी हे चेअरमन पदी विराजमान झाले. मागील वर्षी नाट्यमय घडामोडी घडवत पंडीत लाड हे चार वर्षात तिसरे चेअरमन म्हणून विराजमान झाले. परंतू पंडीत लाड यांची चेअरमन म्हणून कारकीर्द सुरूवातीपासूनच वादळी ठरली. पंडीत लाड व अनिल बागुल यांच्यात संगनमतानेच नऊ नऊ महिन्यासाठी चेअरमन पदाकरीता संगनमत झाले होते. मे महिन्यात पंडीत लाड यांचा कालावधी संपला असतांना देखील त्यांनी ठरल्या नुसार राजीनामा दिला नसल्याने संचालक अनिल बागुल, विठ्ठल चौधरी, श्रीकृष्ण पवार, सुभाष पवार ,सर्जीराव बोरसे व विमलबाई पवार यांनी आपले राजीनामे सामूहीक रीत्या स्वहस्ताक्षरात स्वतंत्र सचिव वाणी यांचेकडे व त्यांच्या प्रती सहाय्यक निबंधक गुलाब पाटील यांचे कडे सुपूर्द केले. आम्ही चेअरमन पंडीत लाड व सचिव वाणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामे दिल्याची भावना यावेळी संचालकांनी व्यक्त केली. तसेच गेल्या दोन महिन्यात मुख्य लिपीक एकनाथ लोहार व रेशनदुकानदार जगदीश पाटील यांच्या सेवा मुदतवाढीला सर्वसाधारण सभेत चार व दोन वर्षांनी या आठ संचालकांनी बहूमताने मुदतवाढ दिली असतांना देखील सचिवांनी प्रोसीडींग लिहीली नाही व दोघा कर्मचा-यांची सेवासमाप्ती केली, अवाजवी खर्च, मागितलेल्या प्रोसीडींगच्या नकला न मिळणे, प्रोसीडींग न लिहीणे , कर्मचारी वर्गाला त्रास देणे,अशा अनेक मनमानी निर्णयांनी कंटाळून आम्ही राजीनामे दिल्याची माहिती संचालक अनिल बागुल यांनी दिली.
तर संचालक विठ्ठल चौधरी यांनी सचिव राजेंद्र जगन्नाथ वाणी सोसायटीच्या काम ऐवजी राजकारण खेळत आहे. त्यांनी आतापर्यंत संचालकांना विश्वासात न घेता अपमानास्पद वागणूक देतात. त्यांच्या बाबत आम्ही आठही संचालकानी जिल्हा क्रेडर कडे बदलीसाठी व अन्य कारणासाठी तक्रारी केल्या.परन्तु जिल्हा क्रेडर मार्फत चौकशी न होता. सचिवाला पाठीशी घातले जात आहे. आम्ही दाद कोणाकडे मागावी हे समजत नाही. यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत. असे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९३९ पासून प्रथमच संस्थेच्या मनमानी कारभार व जाचाला कंटाळून संस्थाचालकांनी राजीनामा देऊन संचालक मंडळ बरखास्तीची वेळ आतापर्यंत आली नाही. मात्र ही संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्यकाळातील हि नामुष्कीची बाब असल्याची चर्चा आहे.
पातोंडा विकास सोसायटी नेहमी सत्तेच्या खुर्चीमुळे वादात चर्चेत आहे. संस्थेच्या विकासा ऐवजी व शेतकरी सभासदांच्या सुविधा पुरवण्याऐवजी सत्तेसाठी राजकीय खुर्चीमुळे संस्थेच्या कारभार व विकास खुंटला व संस्था अधोगतीच्या मार्गावर जात आहे.अशा प्रतिकिया जाणकार शेतकरी सभासदांमधून उमटत आहे.
*बाईट -*
" संचालकांनी सचिवांना दिलेल्या राजीनाम्याच्या प्रती मला प्राप्त झाल्या असून सदर राजीनामे मंजूर करण्या करीता सचिव मिटींग बोलावतील त्यात जर राजीनामे बहूमताने मंजूर झाले तर पुढील अहवाल आमच्या कार्यालयास सादर केल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल."
*गुलाब पाटील , सहाय्यक निबंधक अमळनेर*