अमळनेर प्रतिनिधी
सध्या पावसाने ब-यापैकी जोर धरल्याने शेती कामांसोबतच वृक्षारोपणाच्या मोहिमा वेग धरू लागल्या आहेत. याचेच औचित्य साधून पातोंडा परीसर विकासमंचने या वर्षी पाच हजार वृक्षारोपणाचे ध्येय ठरवले असून आज गावातून विकासमंच सदस्य, लहानथोरांच्या व दत्त भजनी मंडळाच्या सहकार्याने वृक्ष दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी विकासमंचने गावात एक हजार रोपांचे वाटप करून वृक्ष आपल्या दारी या संकल्पनेची मुहूर्तमेढ केली. प्रत्येक ग्रामस्थाला रोपांचे वाटप करतांना त्यांना जगवण्याकरीता तिन वर्षांचे हमीपत्र लिहून घेण्यात आले. याला ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच येत्या काही दिवसात पाच हजार वृक्ष लागवडीचे ध्येय पुर्ण करण्यात येणार अशी माहिती विकास मंच सदस्यांनी दिली.
- विशेष सहकार्य -
ग.स. संचालक सुनिल अमृत पाटील यांनी कै कस्तूराबाई ओंकार पवार यांच्या स्मरणार्थ ट्री गार्डची व्यवस्था करून दिली आहे. तसेच भिकेश पावभा पाटील यांनी ट्रीगार्ड व रोपांची मदत पाठवली आहे. तसेच काही नर्सरीजनी रोपांची गुप्त मदत केली आहे. सर्वांचे विकास मंच च्या वतीने आभार मानण्यात आले.
- अकरा हजाराचे बक्षीस -
वीस वृक्ष लावून दोन वर्षात जगवून संवर्धन करेल अशा व्यक्ती अथवा संस्थेस स्व महेश पन्नालाल थोरात यांच्या स्मृतीपित्यर्थ अकरा हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह व सन्मानपत्र असे बक्षीस विकास मंच मार्फत देण्यात येणार आहे. या स्पर्धेत ग्रामस्थ, जि.प. शाळा , दत्त विद्या मंदिर शाळा, विद्यार्थी व माहिजी देवी देवस्थान यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवीला आहे.
फोटो - कै महेश पन्नालाल थोरात वृक्षारोपण स्पर्धेत भाग नोंदविणारे श्री दत्त विद्या मंदिर विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी