शारदा विद्यालयात बँड पथकाने विद्यार्थ्यांचे केले स्वागत.
अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे ता.अमळनेर येथील विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन,संचालक,व शिक्षकांनी ढोल ताशा व बँन्ड पथकद्वारे वाजत गाजत विद्यार्थ्यांचे शाळेत
स्वागत केले.शाळेच्या पहिल्याच दिवशी पताका तोरणे,सडा रांगोळ्यांनी शाळेचे आवार सजविणेत आल्याने शाळेत येणारे
विद्यार्थी सर्वत्र मंगलमय वातावरणाने भारावून गेली.
विद्यार्थी प्रवेशोत्सवाची तयारी दोन दिवसापासूनच करण्यात आली होती.मुख्य इमारतजवळ भव्य शामियाना
उभारणेतआला.प्रवेशद्वाराजवळ चेअरमन सर्व संचालक मुख्याध्यापक शिक्षकानी प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवूनच प्रवेश दिला.त्यानंतर शाळेच्या आवारात आयोजिलेल्या परिचय
मेळाव्यात सर्व विद्याथ्र्यांना शालेय नियम,शिस्त,शाळेची गुणवत्ताबाबत संचालक जी.आर.चौधरी यांनी मार्गदर्शन
केले.शारदादेवीच्या प्रतिमा पूजनानंतर ,मोफत पाठ्यपुस्तकाचे
वाटप संचालक मंडळाच्या हस्ते करणेत आले.चेअरमन महेंद्रलाल कोठारी अध्यक्षस्थानी होते.त्यांच्या हस्ते सर्व विद्याथ्र्यांना मिठाई वाटप करणेत आली.यावेळी उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन,संचालक यादव चौधरी,दिपचंद छाजेड,योगेंद्रसिंग पाटील,सुनिल छाजेड,जी.आर.चौधरी,किसनसिंग राजपूत,प्रशासन अधिकारी जी.टी.टाक ऊपस्थित होते.मुख्याध्यापक अरूण सोनवणे,डी.डी.राजपूत यांनीसुत्रसंचालन केले..
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर त्यांनी प्रयत्न केले.