जि.प.प्राथ.ढेकू बु तांडा शाळेत नवोगतांचे स्वागत....
अमळनेर:प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील जि प प्राथ शाळा ढेकू बु तांडा येथे शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सुरुवातीला गावात प्रभात फेरी काढून शिक्षणाचे महत्व घोषणाद्वारे समजवून सांगितले,त्यानंतर नवोगत विद्यार्थ्यांचे नाव फलकावर लिहून लाऊडस्पीकर द्वारे घोषीत करण्यात आले,व पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यांत आले,सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक पदाधिकारीच्या हस्ते वाटप करण्यात आले
श्री किरण जाधव यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाटी,वही,पेन,पेन्सिल,रबर,शाॅपनर, यांचे वाटप केले व विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून नृत्य,गाणी,बडबडगीताचा कार्यक्रम घेण्यात आला,मध्यान्यभोजनात भात,फोडणी चे वरण,वांगे बटाटे मीक्स भाजी,सोनपापडी,केळे देण्यात आले,दुपार सत्रात पूर्व तयारी म्हणून प्रत्यक्ष अध्यापणास सुरुवात करण्यात आली,या दिवसभराच्या कार्यक्रमास श्री सुभाष पवार,किरण जाधव,निंबा पवार,रायमल जाधव,किशोर पवार,योगेश जाधव,संदिप पवार,मोहन राठोड,दिपक जाधव,बिरबल पवार,कैलास पवार,रामसिंग जाधव,विमलबाई राठोड,संतोष राठोड यांनी सकाळ पासून उपस्थिती देवून कार्यक्रमांची शोभा वाढवली.
उपशिक्षक श्री किरण बाविस्कर यांनी कार्यक्रमांचे सुरेख असे नियोजन केले,श्री धिरज पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.