लोकमान्य विद्यालय,अमळनेर येथे पहिल्या दिवशी गुलाबपुष्प व पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील लोकमान्य विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष 2019-20 वर्षाला सुरूवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी नवचैतन्यमय वातावरणात इ.5 वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे पदाधिकारी श्री.विवेकानंद भांडारकर सर, श्री.फुलपगारे सर, श्री.डी.डी.पाटील सर व व्यासपिठावरील मान्यवर व्यक्तींनी नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. व्यासपिठावरील मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्याचप्रमाणे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमीत्त श्री.जे.के.चौधरी सर यांनी शालेय विद्यार्थ्यांना, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना, तंबाखू मुक्त व इतर व्यसनांपासून कसे मुक्त राहता येईल याविषयी शपथ दिली.
सदर प्रसंगी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा संच इ.5 वीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जे.के.चौधरी यांनी केले. संस्थेचे पदाधिकारी श्री.डी.डी.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून होणारे दुष्परीणाम तंबाखू व इतर व्यसनांपासून कसे दूर राहता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी श्री.विवेकानंद भांडारकर सर,श्री.फुलपागारे सर,श्री.डी.डी.पाटीलसर, विद्यायाचे मुख्याध्यापक श्री.रविंद्र लष्करे सर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.जे.के.चौधरी यांनी तर आभार श्री.एम.पी.सोनार यांनी मानले. यानंतर विद्यार्थ्यांना श्रीगणेशा चित्रपट दाखविण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहात चित्रपटाचा आनंद घेत शाळेचा पहिल्या दिवसाच्या श्रीगणेशा केला.