Halloween party ideas 2015


अंचळगाव तांडा येथे पाठीवर बसवून नवगताला आणले शाळेत.

अमळनेर प्रतिनिधी

अंचळगाव तांडा- येथील जि.प.शाळेत शाळेच्या पाहिल्या दिवशी पहिलीच्या दाखल बालकांना मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी आपल्या पाठीवर आणत बालकांचा उत्साह वाढविला .सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , शिक्षणप्रेमी नागरिक , विध्यार्थी यांनी गावात मिरवणूक काढली व प्रवेशपात्र बालकांना मानसन्मानाने गुलाबपुष्प देऊन शाळेत आणण्यात आले.मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी यां नवागतांना आपल्या पाठीवर घेत गाडीत बसविले व शाळेत आणले.त्यामुळे बालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.यावेळी प्रतिमा पूजन झाल्यावर मोफत पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष रवींद्र राठोड, तुळशीराम राठोड, विकास पवार , ग्रामसेवक नितेश पाटील उपस्थित होते.ग्रामसेवक नितेश पाटील यांनी बालकांना चॉकलेट गोळ्या यांचे  वाटप केले .मध्यान्ह भोजनावेळी गोड पदार्थांचे वाटपहीं करण्यात आले .यावेळी मुख्याध्यापक  सुरेंद्र बोरसे यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्ती बाबत शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज देवरे यांनी केले तर आभार सतिश पाटील यांनी मानले.यशस्वीतेसाठी योगेश परदेशी , अंगणवाडी सेविका मेनकाताई चव्हाण, सरला राठोड , प्यारीबाई राठोड यांनी परिश्रम घेतले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.