Halloween party ideas 2015



सानेगुरुजी विद्यालयात 'नवागतांचे स्वागत '    अमळनेर प्रतिनिधी 

अ.शि.प्र.मंडळाचे साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी कन्या हायस्कुल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने इ.8 वी त नवीन प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांना संस्थेचे सचिव श्री. संदीप बी.घोरपडे, श्री.गुणवंतराव गुलाबराव पाटील, श्री.अशोक के. बाविस्कर, श्री.यशवंतराव भास्करराव देशमुख, व व्यासपिठावरील मान्यवर व्यक्तिंनी नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.व्यासपिठावरील मान्यवरांनी साने गुरुजी व सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.

        त्याचप्रमाणे जागतिक तंबाखू दिनानिमीत्त श्री.डी.ए.धनगर सर यांनी शालेय विद्यार्थ्यांना, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना, तंबाखू मुक्त व इतर व्यसनांपासून कसे मुक्त राहता येईल याविषयी शपथ दिली.      

            सदर प्रसंगी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा संच इ.8वीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका  श्रीमती अनिता डी.बोरसे यांनी केले.जेष्ठ शिक्षक श्री.सुनील पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त भविष्याविषयी आपली वाटचाल या विषयी मार्गदर्शन  केले.      अध्यक्षीय भाषणात श्री.संदीप घोरपडे यांनी तंबाखू व इतर व्यसनांपासून कसे दूर राहता येईल ,शाळेचे संस्कार, नितीमित्तेचे धडे  जीवनात जोपासा असे मत व्यक्त केले.     

          या कार्यक्रमाला श्री.संदीप बी.घोरपडे, श्री.गुणवंतराव गुलाबराव पाटील ,श्री.अशोक के.बाविस्कर, श्री.यशवंतराव देशमुख, श्रीमती अनिता बोरसे, श्री.सुनील पाटील,श्री.दिलीप पाटील,श्री.मनिष उघडे ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.विलास चौधरी यांनी तर आभार श्री.जे.एस.पाटील यांनी मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.