शिरूड जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे केले स्वागत आगळेवेगळे.
विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना दिले मिष्ठान्न भोजन.
अमळनेर प्रतिनिधी- आदर्श व उपक्रमशील शाळा शिरूड येथे जिल्हा परिषद शाळेत आज शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधवांनी सकाळी लवकर येऊन शाळेचा परिसर स्वच्छ व रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत करून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी जनजागृती केली. विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
जि .प .शाळा शिरूड येथे प्रवेशोत्सव साजरा सकाळी सात वाजता वाद्य घोडा चित्र रथ व त्यावर इयत्ता पहिली प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत प्रभातफेरी गावातून काढण्यात आली त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुपडु पाटील व पं.स माजी सभापती श्री शाम अहिरे यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत व पुस्तक वाटप करण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री ज्ञानेश्वर पाटील आत्माराम पाटील तसेच मुख्याध्यापक श्री राजेंद्र नांदवडे उपशिक्षक श्री छोटूलाल सूर्यवंशी ,अशोक पाटील, चंद्रकांत पाटील ,उपशिक्षिका श्रीमती संगीता पाटील, दर्शना चौधरी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले समारोपात तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली व विद्यार्थ्यांना गोड भोजन देण्यात आले.