Halloween party ideas 2015



जि प प्राथमिक शाळेचा पहिल्याच दिवशी अनोखा स्तुत्य उपक्रम

शापोआ स्वयंपाकीबाईला उपलब्ध करून दिले भाजीपालासाठी दोन हजार रुपये.

अमळनेर प्रतिनिधी-

आज जि प प्राथमिक शाळा धाबे येथे शाळेच्या पहिल्या दिवसाची अनोख्या पध्दतीने सुरुवात करण्यात आली. तशी उन्हाळा सुटीतही नियमित शालेय पोषण आहार, पुस्तकांशी मैत्री - चला वाचनाने समृध्द होऊ या सारे, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर असे उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी राबविल्याने विदयार्थ्यांची उपस्थिती टिकुन होती.आज सकाळी अगोदर गांवात प्रभात फेरी काढुन जागृती करण्यात आली. नंतर विदयार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विदयार्थांना नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुलांना नवीन पुस्तके, शिक्षकांकडुन वही पेन पाटी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. इयत्ता दुसरीच्या विदयार्थ्यांनाही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध झाली आहेत. शाळेवर दोन्ही शिक्षक आहेत. मुलांना शालेय पोषण आहारात आज सोनपापडीचे गोड जेवण दिले. आजचे विशेष म्हणजे शालेय पोषण आहार रोज अधिक सकस व रुचकर व्हावा म्हणुन त्यात सोयाबिन, मशरुम सह योग्य भाजीपाला व पूरक आहारासाठी स्वयंपाकीण बाई सौ तुळसाबाई भिल यांना दोन हजार रुपये दिले. या कामासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणुन मुख्याध्यापक साळुंखे सतत हा प्रयत्न करीत असतात. यासाठी शासकिय अनुदान मिळते पण ते वेळेवर मिळत नाही व सध्याही मिळालेले नाही आजुन. म्हणुन याबाबत अडचण निर्माण होऊ नये म्हणुन प्रयत्न शाळास्तरावर केले जातात. तसेच आज पर्यंत धाबे गावात पुरुष स्वच्छतागृह नव्होते. नागरिक शाळेचेच स्वच्छता गृह वापरायचे जास्तीची घाण व अडचण होत होती. याबाबत शाळेचे शिक्षकांनी धाबे शेळावे सरपंच राजेंद्र बाबुराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती सौ छायाताई पाटील, ग्रामसेविका सौ योगिता पाटील यांच्या लक्षात ही समस्या आणुन दिली व स्वच्छता गृहाच्या उभारणीची विनंती केली. मे च्या पाणीटंचाईच्या काळातही त्यांनी भव्य छान स्वच्छतागृहाची निर्मिती करुन गावकरींना स्वतंत्र सोय निर्माण करून दिली. अमोल राजेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. या वर्षी अधिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम व लोकसहभाग मिळविण्याचा  शाळेचा प्रयत्न राहिल.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.