अमळनेर प्रतिनिधी
श्रीमती दौ रा कन्याशाळा अमळनेर येथे इ ५ वी नवीन प्रवेशित विद्यार्थीनींचे शाळा समिती चेअरमन डॉ बी एस पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पाठयपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी पालकांची देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तसेच प्रथम दिवशी विदयार्थीनींची देखील उपस्थिती लक्षणीय होती
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जे के सोनवणे उपमुख्याध्यापक डी एच ठाकुर शाळेचे शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनी उपस्थित होते