शाळेसाठी विद्यार्थ्यांची तयारी अन् विद्यार्थ्यांसाठी शाळेची
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय हे जवळपास दीड महिन्याच्या सुट्टीनंतर (१७ जून) आज सोमवार पासून शाळा सुरू झाली. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक आणि नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळेने ही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार सोबत मिष्ठान्न तसेच मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प (फूल) देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी,विद्यार्थिनी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.