अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी स्वागत केले.
नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन यांनी तंबाखूमुक्त शाळा याबाबत विदयार्थ्यांनां शपथ दिली.आठवीच्या विदयार्थ्यांनां पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचा परीसर स्वच्छ करून विदयार्थ्यांनचे फलकलेखन करून सजावण्यात आला.यावेळी शाळेचे शिक्षक एस.के.महाजन,एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.