माळी समाजाला राजकीयदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उपाय योजना
जिल्ह्यात माळी समाज संघटन मोठ्या प्रमाणावर----प्रदेशसंघटक प्रविण बी.महाजन
अमळनेर प्रतिनिधी
: महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणी महाबैठक रविवार दि.७/७/२०१९ रोजी दु.२ वाजता राजीव गांधी टाऊन हॉल शिवाजी चौक पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे.माळी समाजाचे मोठ्या प्रमाणावर समाज संघटन असून जिल्ह्यात ते मजबूत आहे.संघटनात्मक दृष्ट्या वाढ होण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.पुढील संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र माळी समाज महासंघ प्रबळ करावा राजकारणात पाहिजे तसा माळी समाज सक्षम नाही समाजाला राजकारणात योग्यस्थान कसे मिळवता येईल यावर चर्चा करण्यात येणार असून जिल्ह्यात माळी समाज हा मोठ्या प्रमाणावर संघटित आहे.असे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रविण बी.महाजन यांनी सांगितले आहे या बैठकीस जिल्ह्यतील सर्व पदाधिकारी कार्येकर्ते शाखा प्रमुख महिला पदाधिकारी समस्त समाज बांधवांनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीण महाजन यांनी केले आहे.आधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष रमेश सोनवणे,आप्पा महाजन चाळीसगाव,सागर महाजन,आबा महाजन,चेतन महाजन भडगाव,दीपक महाजन पाचोरा,भिमराव महाजन,बापूराव महाजन ,रमेश माळी,डॉ. डिंगम्बर माळी,गोपाल माळी,शिवाजी महाजन,श्रीकृष्ण माळी, प्रवीण माळी, काशीनाथ माळी,विपुल माळी,संजय महाजन अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा