अँड ललीता पाटील
जिजाऊ बहुद्देशीय संस्थेतर्फ तालुक्यातील 500 गुणवंताचा सन्मान.
अमळनेर प्रतिनिधी-परीक्षा देऊन गुण मिळाल्यावर यश संपादन करीत असतांना माणूस बनायला शिका.मोठ होत असताना जीवनात माणूसकी व सामाजिक बांधिलकी जपली पाहीजे.तसेच अपयश आल्यावर खचुन जाऊ नये कोणतीच वेळ हि शेवटची नसते.प्रयत्न करणारा कधीच अपयशी होत नाही यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिका असा सल्ला अँँड ललिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अमळनेर येथील जिजाऊ बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अमळनेर शहर व तालुक्यातील इ 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणार्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुमारे 500 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,शिक्षणपयोगी भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अँँड ललिता पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर विभागाच्या उपविभागीय अधिकारी सिमा अहीरे,संस्थेचे संचालक पराग पाटील,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदिप अग्रवाल,विश्र्वस्त वसुंधरा लांडगे,अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा,व्हा चेअरमन प्रवीण जैन,प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन उपस्थित होते. राष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आपल्या मनोगतातुन उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी खा शि मंडळ,अर्बन बॅंकेचे नवनिर्वाचित पदाधिकारी,नीट परिक्षा,फार्मसी,प्रताप महाविद्यालय व सर्व तालुक्यातील 12 वी कला,वाणिज्य,विज्ञान यातील गुणवंत तसेच अँँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल सी बी एस ई बोर्ड परीक्षेतील तसेच तालुका व शहरातील इ 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.नोंदनी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शालेयपयोगी भेटवस्तू व प्रमाणपत्र मिळाल्यावर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता.यावेळी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.सुत्रसंचालन संस्थेचे प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.वंदे मातरम म्हणुन कार्यक्रमाची सांगता झाली.