तरूणाईचे एकच ध्येय, झाडे लावू या सर्वदूर
अमळनेर प्रतिनिधी- एकच ध्येय ,एकच ध्यास ,गावात काही तरी करण्याचा नवीन ध्यास! गरज असेल तिथे धावून जाण्याचा ध्यास, लोकांचे भले करण्याचा गावात काहीतरी नवीन करण्याचा मनात ध्यास घेऊन देवगाव देवळी येथील तरुणाई आपल्या गावात सतत चार वर्षापासून दुष्काळ असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली गावाची परिस्थिती सुधारावी पाऊस चांगला पडावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवगाव देवळी येथील तरुण व युवकांनी वृक्षारोपण करण्याचा मनात चंग बांधला आणि नाही नाही करत वृक्षारोपणाला सुरुवात केली. वृक्षारोपणाचा घेतलेले गावासाठी एक छोटेसे काम भविष्यात त्याचे वटवृक्ष होईल गावाच्या सौंदर्यात भर पडेल वरुण राजाची कृपादृष्टी होईल गावाचा विकास होईल असे भविष्य तरुणांनी डोळ्यासमोर ठेवले आहे पद्य प्रत्यक्षात साकार झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.....
सध्या देवगाव देवळी मधील महात्मा फुले हायस्कूल मधील माजी विद्यार्थी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावाच्या विकासात योगदान देत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो त्यांच्या कामास आमचा सलाम!
सामाजिक कार्यकर्ते, मोहम्मद मुश्ताक शाकीर धरणगाव यांच्या कडून 20 झाड़े दिली होती. तसेच देवगांव देवळी येथील व्हाट्सएपच्य आपल्या ग्रुप मधील मुलानी दिलेल्या मदतीतुन जाडी घेतल्या..या सर्व मदत करणारे नागरिक,विदयार्थ्यांनच्या सहकार्य बद्दल आभार।