Halloween party ideas 2015


आर्मी मॅन सचिन सैदाणेच्या सेवानिवृत्ती निमित्ताने धार येथे उदया सत्कार व मिरवणुकीचे ग्रामस्थांनी केले आयोजन.


अमळनेर प्रतिनिधी 
भारतीय सैन्य दलात ३६ मराठा तोफखाना रेजीमेंट (आर्मी) मध्ये अखंड १७ वर्ष सेवा बजावलेले सचिन रमेश सैंदाणे हे  आज दि ३० रोजी सेवानिवृत्त झाल्यामूळे तालूक्यातील धार येथील ग्रामस्थांचे वतिने त्यांचा दि १ रोजी मिरवणूक व सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. सचिन सैंदाणे हे मूळचे धार येथील  रहिवाशी असून दि ७/१/२००३ मध्ये ते भारतीय सैन्यदलात भरती झाले होते दिल्ली अरूणाचल प्रदेश झाशी येथे त्यांनी लान्सनायक पदावर कामगीरी केली धार गावातील सैन्यदलात १८ तरूण देशाच्या विविध ठिकाणी सेवा बजावित असून त्यात ५ तरूण सेवानिवृत्त झाले आहे प्रथमच सेवानिवृत्त सैनिकाचा धार ग्रामस्थाचे वतीने मिरवणूक व सत्कार सोहळा होत असून यासाठी माजी आ डॉ बी एस पाटील प्रा गणेश पाटील मारवडचे पीएसआय यांचेसह  पंचक्रोशीतील राजकिय पदाधिकारी ऊपस्थित राहाणार आहे सुभाष चौकातील विजय सलूनचे मालक रमेश सैंदाणे यांचे ते चिरंजीव आहेत सेवा निवृत्त सैनिकाच्या सत्कारासाठी संपूर्ण धार गावातील ग्रामस्थ एकवटले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.