राज्याच्या अर्थसंकल्पात अमळनेर तालुक्यातील रस्ते विकासासाठी आ.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने भरीव तरतूद
अमळनेर-दि.१८ रोजी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील विविध रस्त्याच्या विकासासाठी आ.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने ०9 कोटी रुपये किमंतीच्या रस्ते विकास कार्यक्रमाला मंजुरी मिळाली आहे.तालुक्यातील विविध रस्त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी आ.स्मिता वाघ यांच्याकडे केली होती.
राज्याच्या अर्थसंकल्पात एरंडोल-कल्याणी-डांगरी-निम-मांडळ प्रजीमा ५२ वर कि.मी.७९/४०० ,८२/८०० व ८३/०० मध्ये लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी,अमळनेर-बहादरपूर -मोंढाळे-मारवड-निम प्रजिमा ४९ किमी ३३/०० ते ४४/०० मध्ये अभियांत्रिकी सुधारणा करण्यासाठी ०३ कोटी,रा.मा.३९ ते जांभोरा-ढेकू-अमळनेर-मांडळ प्रजीमा किमी ३२/५०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ०१ कोटी ५० लक्ष एरंडोल-कल्याणी-डांगरी-निम-मांडळ प्रजीमा ५२ वर कि.मी.७७/३०० ते ७९/३०० मध्ये मजबुतीकरणासह सुधारणा करणे १ कोटी ,चोपडा-चुंचाळे-कलाली-निंभोरा रस्ता प्रजिमा ३ किमी ३९/०० ते ३९/३०० कलाली व निंभोरा गांवाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे-८० लक्ष रुपये रा मा 39 ते जांभोरा-ढेखू-अमलनेर-मांडळ रस्ता प्रजिमा 51 किमी 30/500 वर लहान पुलाचे बांधकाम करने-1 कोटि रुपये ह्या तालुक्यातील ग्रामीण मार्ग तसेच जिल्हा मार्गासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या मेहेरगांव-धुळे-अमळनेर-चोपडा ह्या रा.मा. १५ मधील कि.मी ७३/३०० मधील गडखांब गांवाजवळ असलेल्या पुलाची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ८० लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आल्यामुळे राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.तालुक्यातील ह्या रस्ते विकासाच्या कान्माना मंजुरी मिळाल्यामुळे दळणवळणाच्या सोयी मध्ये वाढ वाहून नागरिकांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार
राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील विविध रस्त्याच्या विकासासाठी आ.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने ० 9 कोटी रुपये किमंतीच्या रस्ते विकास कार्यक्रमाला मंजुरी मिळाल्याबद्दल नागरिकांनी आ स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहेत तर आ स्मिता वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री मा.ना.श्री.सुधीर मुंनगटीवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील,जलसंपदा तथा पाक्लामंत्री मा.ना.श्री.गिरीष महाजन यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.