आझाद मैदानावर एकच मिशन,जुनी पेंशनचा नारा घुमला.
शिक्षक आमदारासह पदवीधर आमदारांनी भेट देऊन दिला पाठींबा.
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-आज पासून मुंबई येथे आझाद मैदानावर २००५ पुर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाराष्ट्रातील हजारो कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.महाराष्ट्रातील पस्तीस हजार कर्मचारी वर्गावर शासनाने अन्याय केला आहे. काही शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहे. या शिक्षकांचे भविष्य काय? शासनाच्या विनाअनुदानित, अंशताअनुदानित धोरणाचे बळी ठरले आहेत.एकीकडे विनाअनुदानित काळातील सेवा वरीष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राहय धरली जाते. मग पेंशन का नाही? यासाठी पेंशन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगिताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर उपोषण आज पासून सुरू असून विस हजार शिक्षक उपोषणाला बसले आहेत.
जोपर्यंत २००५ पुर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पेंशनचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील असे सांगितले.
या उपोषण स्थळी पहिल्याच दिवशी विविध शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांनी आंदोलनस्थळी एकञीत भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला आम्ही आपला विषय विधानभवनामध्ये सविस्तर मांडण्याचे आश्वासन दिले यामध्ये पुणे शिक्षक आ.मा.दत्ता सावंत,मराठवाडा शिक्षक आ.मा.विक्रम काळे,नाशिक शिक्षक आ.मा.किशोर दराडे,कोकण शिक्षक आ.मा.बाळाराम पाटील,नाशिक पदवीधर आ.मा.डॉ.सुधीर तांबे,अमरावती शिक्षक आ.मा.श्रीकांत देशपांडे,औरंगाबाद पदवीधर आ.मा.सतिश चव्हाण,मुंबई शिक्षक आ.मा.कपिल पाटील आदी मान्यवरांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या व आम्ही सर्वजण जरी वेगवेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी तुमच्याबरोबर आहोत अशी ग्वाही दिली.....