देवगाव देवळीत वादळी वाऱ्यामुळे विजेचे तार व खांब ,वृक्ष पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान.
देवगाव देवळीत वादळी वाऱ्यासह पाऊसात गावात झाडे व विजेचे तार,खांबे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान
अमळनेर प्रतिनिधी- जून महिना संपला अमळनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव वरुण राजाचीी आतुरतेने वाट पाहत होते. अगोदरच तीन ते चार वर्षापासून सतत दुष्काळ असल्याने विहीरी कोरड्या पडलेल्या आहेत पाण्याचीी तीव्र टंचाई आहे. काल राात्री वरूण राजाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी पडल्या खरी वातावरणात थोडा गारवा आला पण वादळी वाऱ्यामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचेे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
अमळनेर तालुक्यातील देवगांव देेवळी येेथे काल रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाच्याा सरी कोसळल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विजेचे पोल पडल्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित होता मोठी ठेरेदार वृक्ष जमीनदोस्त झाली . पशुधनाचा चारा खराब झाला.विजेच्या तारा तुटल्या. देवगाव देवलीत मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याचे शेतकरी बांधवांकडून बोलले जात आहे .नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.