बंडखोर नगरसेवकांचे जिल्हाधिकार्यांना साकळे व निवेदन.
अमळनेर प्रतिनिधी
सध्या अमळनेर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना पाण्यासाठी लोकांना वणवण फिरत असताना सत्ताधारी काही बंडखोर नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सुटावी यासाठी जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवा चक्क त्यांना साकडे घालून निवेदन दिले.
अमळनेर नगरपरिषदेच्या सत्ताधारी बंडखोर नगरसेवकांनी प्रभागातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी गटातून बंडखोरी करत चक्क तीन दिवसापूर्वी नगरपालिकेत येऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घातला व आपला संताप व्यक्त केला. प्रभाग 14 मधील नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांचे चिरंजीव रविंद्र पाटील ,प्रभाग 15 मध्ये नगरसेवक प्रताप शिंपी यांनी नागरिकांची पाण्याची तहान भागावी म्हणून टँकरच्या साह्याने मदतीचा हात पुढे करत टॅंकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला.
प्रभागातील पाण्याचा प्रश्न व शहरातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी एकत्र येत बंडखोरी करून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अमळनेर शहराच्या बिकट झालेल्या पिण्याच्या पाणी प्रश्नी तातडीची उपाय योजना करण्याची चर्चा करून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करा चक्का आव्हान केले.
निवेदन देतांना नगरसेवक प्रताप शिंपी, सुरेश पाटील, संतोष पाटील, संजय भिल, साखरलाल महाजन, रवि पाटील, राजेंद्र यादव, संजय (भूत बापू ) पाटील, महेश पाटील, संजय पवार इ. उपस्थित होते.
फोटो
जळगाव येथे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करा असे आशयाचे निवेदन देताना नगरपालिकेतील सत्ताधारी बंडखोर नगरसेवक.
छाया ईश्वर महाजन अंमळनेर