दिर्घ प्रतिक्षेनंतर वरूणराजा बरसल्याने शेतकरी सुखावला.
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यात दिर्घ प्रतिक्षेनंतर वरूणराजाने कृपादृष्टी केल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव सुखावला आहे.अशीच वरूणराजाची कृपादृष्टी यावर्षी राहीली तर नद्या, नाले,नदया यांना पाणी येऊन पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.गेल्या तिन ते चार वर्षांपासून सतत दुष्काळ असल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.
अमळनेर तालुक्यात अनेक भागात काल व आज वरूणराजा मेहरबान झाल्याने काही भागात चांगला पाऊस झाला. काही शेतकरी बांधवांनी कपाशीची लागवड अगोदर केली होती. तर काही शेतकरी लागवड करीत आहेत तर काही शेतीची मशागत करीत आहेत. सध्या तरी अमळनेर तालुक्यातील वरूणराजाची कृपादृष्टी असल्याने सध्या तरी शेतकरी राजा सुखावला असून शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अमळनेर तालुक्यात देवगांव देवळी ,नगांव, दहीवद,अमळगांव,मारवडपरिसर व इतर तालुक्यातील परीसरात वरूणराजाने हजेरी लावली