कु.पायल नेतकर हीचा सत्कार ..
अमळनेर प्रतिनिधी
उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत कु.पायल आनंदराव नेतकर हीने सायन्स विभागात 90.15 %मिळवून अमळनेर तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला होता.तरी तिने या घवघवीत यश संपादन केल्या बद्दल जिजाऊ बहुद्देशिय संस्था , अमळनेर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हीचा सत्कार अॕड ललिता श्याम पाटील , खान्देश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधरा ताई लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे संचालक मंडळ एडवोकेट ललिता पाटील इंटरनेशनल इंग्लिश स्कूल चे प्राचार्य व शिक्षक वृंद उपस्थित होते.