आदिवासी पारधी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची विविध मागण्यांसाठी भेट,चर्चा आणि निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील आदिवासी पारधी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची भेट घेऊन चर्चा केली.यात
१) स्वउत्पन्न करातून दलित वस्ती सुधार योजने प्रमाणे आदिवासी अनुसूचित जमातीसाठी खर्च केला जाणार निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे कारण तसे पाहिले तर अनुसूचित जातीचे तीन नगरसेवक असून अनुसूचित जमातीचे दोन नगरसेवक आहेत म्हणजेच त्या प्रमाणात लोकसंख्या उपलब्ध आहे तरीही अनुसूचित जमाती वस्ती साठी स्वतंत्र खर्च केला जात नाही या संदर्भात शासन पातळीवर प्रयत्न करून लवकरात लवकर निधी खर्च करावा
२)आदिवासी पारधी समाजाच्या समाज मंदिराची अवस्था अत्यंत वाईट असून त्याची दुरुस्ती करावी किंवा नवीन जागा देऊन समाज मंदिर बांधण्यात मदत करावी
३)भोलेनाथ पान सेंटर जवळ समशेरसिंग पारधी चौक मान्यता मिळाली असून चौक येत्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिना पूर्वी पूर्ण करून लोकार्पण करावा
४)आदिवासी संकुल साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती मदत आणि पाठपुरावा करावा
५)आदिवासी विकास परिषदेचे तालुका सल्लागार मधुकर चव्हाण यांच्या घरा समोरील बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकावे
६)आदिवासी पारधी समाजाच्या नगरसेविका राधाबाई पवार यांच्या वॉर्ड क्र 3 मध्ये आजतागायत कोणतेही विकास कामे झालेली नाहीत.रस्ते,गटारी,स्वच्छता इ मूलभूत सुविधा अनेक अर्ज करूनही पूर्ण करण्यात आल्या नाहीत त्या पूर्ण कराव्यात.
७)पारधीवाडा,ताडेपुरा, गांधलीपुरा या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी पारधी बांधवांची वस्ती आहे तेथे कायम अनेक समस्यांना समाजाला सामोरे जावे लागते मूलभूत सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात.
८)9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन नागरपरिषदेत साजरा करण्यात यावा.
वरील समस्या आदिवासी पारधी विकास परिषदेच्या सदस्यांनी मुख्याधिकारी यांच्या समोर मांडल्या त्यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिला असून सोमवारी समाज मंदिर पाहणे,समशेरसिंग पारधी यांचे स्मारक तातडीने पूर्ण करणे,आदिवासी दिन साजरा करण्यासाठी प्रयत्न करणे,नगरसेविका राधाबाई पवार यांच्या वॉर्डातील समस्या तातडीने दूर केल्या जातील इ सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले .या प्रसंगी प्रा जयश्री दाभाडे साळुंके,आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे,तालुका सल्लागार मधुकर चव्हाण, नगरसेविका राधाबाई पवार,संजय पवार,आप्पा दाभाडे,अनिल पारधी,धनराज पारधी इ समाज बांधव उपस्थित होते.