माळी समाजातील स्पर्धा परीक्षा अभ्यास(MPSC/UPSC)करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथे 'निवासी वस्तीगृहाची सोय.....
अमळनेर प्रतिनिधी
राज्यातील माळी समाजाचे अनेक युवक पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी येत असतात.गरीब व गरजू असणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्प फी मध्ये वार्षिक निवासासह,दोन्ही वेळेचे भोजन,नाश्ता, चहा यांच्यासह स्वतंत्र अभ्यासिकेची सोय व्हावी या हेतूने 'महात्मा फुले वस्तीगृह'स्थापन केले आहे. शनिवार वाड्या जवळील लाल महाल च्या पुढे संत सावता माळी भवन,दादासाहेब कुदळे सभागृह च्या वर 'संत सावता माळी विद्यार्थी वसतिगृह' गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या वसतिगृहात खास MPSC/UPSC study करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Study Room,२४ तास वीज,पाणी यासह विविध सोयी उपलब्ध आहेत.अल्प वार्षिक फी मध्ये वर्षभर निवास,दोन्ही वेळचे भोजन,चहा,नाश्ता देण्यात येतो.वसतिगृहात प्रवेशसंख्या मर्यादीत असून प्रवेशासाठी सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
*पत्ता* -महात्मा फुले वस्तीगृह,
संत सावता माळी भवन,लाल महाल च्या पुढे,फडके हौद रोड,बुधवार पेठ,पुणे
कार्यालय दूरध्वनी-02024451051(कार्यालयीन वेळ सकाळी १०.००ते ०६.००)