जन्मोजन्मी साथ लाभो यासाठी महीलांनी वडाला घातल्या प्रदक्षिणा.
वटपौर्णिमेनिमित्त आधुनिक सावित्रीला सलाम!
अमळनेर प्रतिनिधी-पती-पत्नीचे नाने जन्मोजन्मी अखंड रहावे अशी
प्रार्थना करत शहरातील महिलांनी वटपौर्णिमा पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी केली.शहरातील मंदीरात,व इतर
सर्वच भागांमध्ये असणा-या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी रविवारी सकाळपासून महिलांनी गर्दी केली.महीला नवीन साडी,अलंकार खालून सजलेल्या होत्या.आपल्या मनातील इच्छा पुर्ण करण्यासाठी वडाला प्रदक्षिणा घालत होत्या.
प्रामुख्याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यासाठी वटवृक्षाची, वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात.
वडाची पुजा महीला का करतात?
.. .म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात पुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने
त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला! महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष ।
पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला! त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या काळातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय
मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्यापतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा आहे.