अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील धानोरा येथे ग्रामसेवक/सरपंच यांच्याकडे वेळोवेळी पिण्याच्या पाण्याची मागणी करूनही आमची समस्या सोडविण्यात आलेली नाही.तसेच आमच्या गावात पाणी टंचाई असल्याने गावाला टँकर ने पाणीपुरवठा होत असतो,पण पाणी वाटपाच्या ठिकाणी काही ठरावीक लोकांना मुबलक प्रमाणात पाहिजे तेवढे पाणी दिले जाते.तसेच आमच्या गावालगत श्री भाईदास रामा धनगर यांची खाजगी शेतीत विहीर असून त्यांच्या
विहीरीला मुबलक पाणी असल्याने आम्ही समस्त नागरीक पाणी भरण्यास गेलो असता ते आम्हाला पाणी भरण्यास नेहमी मज्जाव करीत असतात. त्यामुळे आमचे सर्वांचे पाण्याअभावी हाल होत आहेत,गावात जवळ पास कुठेही पाणी उपलब्ध नसल्यामुळे दररोज च्या नैसर्गिक गरजांना सुध्दा पुरेसे पाणी मिळत नाही. आम्हांला फारच लांबून पाणी आणावे लागत असून त्याचा त्रास सर्वांना होत असतो तरी आम्हास पाणी मिळण्याची व्यवस्था व्हावी आमच्या भागात पाण्याचा टँकर स्वतंत्र यावा तसेच या ठिकाणी घोटाळा होत आहे की काय याची चौकशी करावी व टॅकंरचे पाणी कागदोपत्री वाटप दाखविली जात आहे याबाबत आमच्या
गावातील संबधीत लोकांची चौकशी व्हावी. अशी मांगणी ग्रामस्थांनी निवेदन द्धरे पं सं अमळनेर चे गटविकास अधिकारी संदिप वायाळ यांच्या कडे केली आहे.