Halloween party ideas 2015


डॉ अमोघ जोशी यांचे सूर मॉरीशस येथे बरसणार.....!
प्रतिनिधी अमळनेर 
अमळनेरचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. अमोघ जोशी यांना दि.२९ जून ते ३ जुलै दरम्यान मॉरीशस येथे होणान्या सांस्कृतिक महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक महोत्सव भारत व मॉरीशस सरकार तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येतो. मॉरीशस येथे असणान्या भारतीयांना या निमित्ताने अभिजात भारतीय संगीताची मेजवानी मिळणार
आहे. त्यामुळे तेथील खास करून महाराष्ट्र मंडळात उत्साहाचे वातावरण आहे. मॉरीशस येथील सुप्रसिद्ध रेड अँड चिली मोबाईल या महोत्सवाची संपूर्ण देशात जाहिरात करत आहे. या दरम्यान डॉ. अमोघ यांना मॉरीशस ब्रॉडकास्टींग कॉपरिशनवर शास्त्रीय गायनासाठी निमंत्रित केले आहे. याचे थेट प्रसारण मॉरीशस देशभरात होणार आहे. सध्या डॉ. अमोघ नेत्ररोग या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. डॉ अमोघ शास्त्रीय गायन व हार्मोनियम या दोन्ही मध्ये संगीत अलंकार या उच्चपदवीने अलंकृत
आहे तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा परीक्षक देखील आहे. त्यांची यशस्वीपणे वैद्यकीय वाटचालही सुरु आहे. आपल्या भागात वैद्यकीय सेवा करतांना अभिजात भारतीय शास्त्रीय
संगीताचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी आपल्या आजीच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वरसुमन प्रतिष्ठानची स्थापना केली असून त्यातून विविध कार्यक्रम ते स्वतः सादर करतात. तसेच भविष्यात या माध्यमातून शास्त्रीय संगीत वृद्धीचा त्यांचा मानस आहे. या वाटचालीसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.