महाराष्ट्र भरात मागीलवर्षी शेतकरी बंधूनी पिकविमा काढलेला होता मात्र शेतकरी ह्या पिकविम्यात पात्र असतांनाही विमा कंपनीने त्यांना अपात्र ठरवून विम्या पासून वंचित ठरवलेले होते, मात्र शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी ह्या विषयांत लक्ष देऊन पात्र वंचित शेतकरींना पिक विमा मिळवून देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती प्रत्येक तालुक्यात शिवसेने मार्फत शेतकरी पिकविमा मदत केंद्र उघडून शेतकरी बंधूंचे माहिती फॉर्म आपल्या पदाधिकारी मार्फत भरून घेऊन ते शिवसेना कार्यालय मुंबई येथे जमा करून त्यांना पूर्ण रक्कम मिळवून देणार आहेत.
आज अमळनेर शिवसेने तर्फे अमळनेर शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स व्यंकेटेश ऍग्रो शॉप जवळ फार्म मदत स्टॉल उभारून फॉर्म भरून घेत आहेत, ज्या शेतकरी बांधवानी फॉर्म आज भरले नाहीत त्यांनी उद्या 4 वाजेपर्यंत सदर दुकानावर भरून आणून द्यावेत ही शिवसेना अमळनेर तर्फे विनंती, अमळनेर तालुका हा मागील वर्षी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेला होता असे असतांनाही पिकविमा काढलेल्या शेतकरीं पैकी त फक्त शिरूड सर्कल मधिल फक्त 20 ते 22 गावांचा पिक विमा मंजूर होऊन इतरांवर अन्याय झालेला आहे तरी शिवसेने मार्फत केंद्रात येऊन सर्वांनी योग्य माहिती देऊन फॉर्म भरल्यास त्यांना न्याय मिळेलच अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें व तालुकाप्रमुख विजू मास्तर यांनी दिली,आज अनेक शेतकरी बांधवानी फॉर्म भरलेले असून काही उद्यापर्यंत आणून देणार आहेत.