दहिवद येथे आज विशेष ग्रामसभेत लोकांमधून ग्रामसभा अध्यक्षांची निवड
अमळनेर प्रतिनिधी
दहिवदच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेला .आजच्या ग्रामसभेत ध्वनीमुद्रित चित्रफितीत श्री.शिवाजी पारधी यानी ग्रामपंचायत अधिनियम कलम ५४ क मधील विषय क्रमांक 3 चा वापर करून ग्रामसभेपुढे सुचक म्हणुन प्रस्ताव घेत ग्रामसभा सदस्यामधून ग्रामसभेचा अद्यक्ष निवडीचा प्रस्ताव ठेवला. त्यात त्यांनी पंकज पाटील यांच्या नावाची शिफारस केली असता ग्रामस्थांनी बहुमताने होकार दिला. परंतु सरपंच यांनी नावाला विरोध केल्यावर स्वतः पंकज पाटील यांनी दत्तू किसन देसले यांचा नावाचा प्रस्ताव ठेवला व ग्रामसभेने अध्यक्ष म्हणून ह.भ.प.श्री.दत्तु किसन देसले यांची निवड केली .
अध्यक्ष म्हणुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाचन केले .त्यांच्या अध्यक्षतेखाली आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार नाला,तलाव खोलिकरण व साफ-सफाई,वृक्षारोपण,बांध-बंदिस्ती करण्यासाठी देण्यात आलेला संदेश वाचण्यात आला .
त्या विषयावर ग्रामस्थांनी ग्रामसभेत विस्तृत चर्चा केली .जनतेमधून पंकज पाटील यांनी आपले मत ग्रामस्थासमोर मांडत गावांतील खोलीकरण मा.मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टी कोणाचा अभ्यास करून करण्यात यावे .शेतकऱ्यांच्या शेतात गाळ ,तसेच रस्ते तयार करण्यासाठी लागणारे गौण खनिज मा.तहसिलदार यांच्या पूर्व परवानगीने देण्याचे ठरविण्यात यावे त्यांच्या त्या विषयाला जनतेने बहुमताने पारित करत एकमताने होकार दिला.त्यानुसार ग्रामसभा अध्यक्ष श्री.द्तु किसन देसले यांनी ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे यांना ठराव लिहिण्यास सांगितला. तसेच गावांतील छतांवरील पाणी देखिल गावांतील बंद पडलेल्या पुरातन विहिरीत(आडमध्ये) सोडून पुनर्भरण करण्यात यावे असे माजी जि.प.सदस्य अशोक तुळशीराम देसले यांनी सांगीतले व ठराव बहुमताने पारित करण्यात आला .
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांचा संदेश खऱ्या अर्थाने दहिवद करांनी आत्मसात करून त्यावर अमलबजावणी केली आहे. अशीच अमलबजावणी तालुक्यातील ,जिल्ह्यातील व देशातील प्रत्येक खेड्यात होणे गरजेचे आहे त्याशिवाय खऱ्या अर्थाने गावा-गावांतील पडणारे थेंब-थेंब पाणी आपण जमिनीत जिरवू शकत नाही .जोपर्यंत खेडी पाण्याने समृद्ध होत नाहीत तोपर्यंत खेड्याचा विकास होणे शक्य नाही . यावेळेस ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.