Halloween party ideas 2015


पालिकेच्या भागीदारीतील खाजगी पाणी विक्रेत्यांवर अखेर कार्यवाही.
सत्ताधारी व प्रशासन विषयी संतापाची लाट.
अमळनेर प्रतिनिधी
"नागरिकांना 6 दिवसाआड,झाडांना रोज,पाणी विक्रेत्याला 24 तास पाणी"या अशा बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर पालिकेच्या भागीदारीत असलेल्या खाजगी पाणी विक्रेत्यांवर कशा प्रकारे वरदहस्त ठेवून नागरिकांचे हाल करून त्यातून सत्ताधारी पैसे कमवत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच जनमानसात पालिकेच्या सत्ताधारी व प्रशासनाविषयी संतापाची लाट पसरली होती.त्यावर पालिकेच्या भागीदारीत असलेले प्रथमेश इंटरप्रायजेस ला अमळनेर नगरपालिका तर्फे शुद्धपेय जल पुरवठा करण्याची( r.o) प्लांट चे काम देण्यात आले होते.यासाठी संबंधित ठेकेदाराने पाणी ची उपलब्धता स्वतः करायची असताना कराराचे उलघन करून प्रमुख जलवाहिणीतून कनेक्शन घेतल्याचे  मुख्याधिकारी शोभा बाविस्कर,पाणीपुरवठा अभियंता हर्षल सोनवणे याना प्रत्येक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता अवैध कनेक्शन आढळले. आरोग्य सभापती संजय भिल यांनी स्वतः खोदून ठेकेदाराने घेेतलेले अवैध कनेक्शन दाखवल्याने कर्मचारी अवाक झाले. सिंधी कॉलनी ला 15 दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने नागरिक संताप करत होते. महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.तसेच जीवनधारा चा प्लांट ला न.पा.ने सील केलं. मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले.प्रसंगी रवींद्र पितांबर पाटील,नगरसेविका शीतल यादव,नगरसेवक सुरेश पाटील,आरोग्य सभापती संजय भिल,नगरसेवक संतोष पाटील,महेश पाटील,साखरलाल महाजन,नगरसेवक शाम पाटील, विरोधी गटनेते प्रवीण पाठक,नगरसेवक सलीम टोपी,संतोष लोहेरे,पंकज चौधरी,बाळासाहेब संदानशिव,सिधि समाज अध्यक्ष गोविंदराम आहुजा,दिलीप सिंधी तथा नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. हा प्लांट चा कार्यालय ला सील करण्यात आले. कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी देखील हजर होते.
कोट- मी जीवनधारा या कंपनीचे सिंधी कॉलनीतील कार्यालयात  गेली असता तेथे अमळनेर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता पालिकेच्या जलवाहिणीतून अवैध कनेक्शन घेतलेले आढळून आले ज्याची कुठलीही परवानगी पालिकेने दिलेली नसल्याने अगोदर ते कार्यालय सील केले आणि त्या ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले आहे.असे शोभा बाविस्कर मुख्याधिकारी न प अमळनेर यांनी कळविले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.