Halloween party ideas 2015



अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागा तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2020 या अंतर्गत कार्यशाळा संपन्न.....
  
 अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषदेच्या तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2020 या योजनेची प्रभावी पणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आज इंदिरा गांधी कार्यालयातील सभागृहात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ह्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी  शोभा बाविस्कर या होत्या.
शहरातील मटण मार्केट मधील मटण विक्रेते तसेच या परिसरातील स्वच्छता,आरोग्य,
प्लास्टिक चा उपयोग,मटण विक्रेत्यांचे आरोग्य,ग्राहक आणि दुकानदारांच्या समस्या इ विषयावर चर्चा करण्यात आली. घंटा गाडीची व्यवस्था,कचरा व्यवस्थापन,पाणी व्यवस्था,मटण मार्केट चे नूतनीकरण इ विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. आज दुपारी चार वाजता मटण मार्केट ला भेट देऊन स्पॉट सर्वेक्षण करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी उपस्थित दुकानदारांना दिले.या प्रसंगी प्रा जयश्री साळुंके,पन्नलाल मावळे,आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,अभियंता प्रशांत ठाकूर,आरोग्य सभापती राधाबाई पवार,मुकादम अनिल बॅंडवाल, गणेश कढरे,विजय सपकाळे,
फय्याज शेख,संजय पवार,
गीता पोतले,आशा पाटील, भारती दाभाडे,दीपाली भोईटे इतर कर्मचारी तसेच मटण विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.