तापीतील डोह आटले,
पाण्याचा वापर काटकसरीने करा-
पुष्पलता पाटील
लोकनियुक्त नगराध्यक्षा अमळनेर
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर शहरातील तापी नदीवरून जळोद येथील पंपिंग स्टेशन अनेक कलाली डोळ्यातून तीन तरंगत्या पंपाद्वारे पाणी पुरवठा केला जातो .गेल्या चार वर्षापासून सतत सरासरीपेक्षा कमी पर्जन्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण समस्या उग्र रूप धारण करून आहे .यंदाच्या वर्षी शहरासाठी उन्हाळ्यात टंचाई काळात हातनुर धरणातून दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे तीन आवर्तनऐवजी जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार हातनुर धरणातील उपलब्ध पाण्याचा साठ्यांचा विचार करता केवळ दोनच आवर्तन प्राप्त झाले असल्याने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सद्यस्थितीत गेल्या मागील महिन्यापासून शहरास तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठा ऐवजी
सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आलेला असूनही जळोद व कलाली डोह येथील तापी नदीतील मागच्या बाजूला ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याला प्रवाहित करून पंपापर्यंत पाणी आणूनही जळोद येथील भूपृष्ठावरील पाण्याची पातळी कमी झाल्याने 10 कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना एक कूपनलिकेतील पाणी आटल्याने बंद पडली आहे .कलाली डोहातही पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील पंप बंद पडली आहेत .त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा जळोद येथील 9 कूपनलिकावरच अवलंबून असल्याने शहरात दररोज एक कोटी 40 लाख लिटर पाणी उपलब्ध ऐवजी सद्यस्थितीत फक्त 50 ते 60 लक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे .त्यामुळे नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजतागायत नियोजन बद्ध कामामुळे शहरवासीयांना सहा दिवसात मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत होता .तथापि मान्सूही लांबणीवर गेल्याने आणि वाढीव तापमानामुळे स्तोत्राची पाणीपातळी खालावल्याने पाणीवाटपाचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे .कृपया अमळनेर शहरातील नागरिकांनी पाण्याची समस्या समजून घेऊन नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी वाटपाबाबतच्या
सूचना द्वारे माहिती देण्यात येईल. त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत असून पर्यायी व्यवस्था म्हणून अमळनेर नगर परिषदेमार्फत शहरातील विविध ठिकाणी असलेले बंद बोरवेल दुरुस्तीचे काम सुरू असून काही ठिकाणी विद्युत पंपाद्वारे ही पाणीपुरवठा सुरू आहे .विविध ठिकाणच्या जुन्या वापरात नसलेल्या विहिरींचा गाळ काढून तेथील पाण्याचा वापर नियमित वापरासाठी तसेच पशुधन व वृक्षसंवर्धन साठी होत आहे .तसेच तापी नदीवरील जळोद पंप स्टेशन समोरील बुधगाव कडील तापी नदीकाठावर सहा ते सात कूपनलिका करून येथील पाणी पाइपलाइन करून जळोद पंपस्टेशन पर्यंत आणण्याचा कामाचा प्रस्ताव आणि कलाली डोह येथील उचलता न येणारा शिल्लक पाणीसाठा उचलण्या करिता उपाय योजना करणे कामीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी जळगाव व माननीय विभागीय आयुक्त नाशिक व माननीय स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे सादर केलेला आहे. जीवनधारा द्वारेही शहरात अल्पशा दरात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी मान्सूनच्या आगमनापर्यंत पाण्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा .नागरिकांना करण्यात येणारा सहा दिवसांआड पाणीपुरवठा पाण्याच्या उपलब्धतेनुसार उशिराने करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आव्हान लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर व अमळनेर नगर परिषद यांनी केले आहे.